आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरण, सोमय्या पिता-पुत्र पोलीस चौकशीला गैरहजर

1038 0

मुंबई- आय एन एस विक्रांत या युद्धनौका निधी प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पोलीस ठाण्यात हजर होता येणार नाही अशी माहिती सोमय्या यांच्या वकिलांनी दिली आहे.

आय एन एस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपयांचा निधी गोळा केला. मात्र, हा निधी सोमय्या यांनी राजभवनात जमा केलेला नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलं. यासाठी त्यांना शनिवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र दोघेही गैरहजर राहिले.

सोमय्या यांच्या वकिलांनी माहिती दिली की, ‘आम्हांला एफआयआरची प्रत आज मिळाली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आज किरीट सोमय्या दिल्लीत आहेत. नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे आज किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पत्रं दिलं आहे. 13 एप्रिलनंतर कधीही सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहतील.’

यासंदर्भात किरीट सोमय्या म्हणाले होते की, आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते असा सवालही त्यांनी केला.

Share This News
error: Content is protected !!