पुणे- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला असून मुश्रीफांची बेनामी मालमत्ता जप्त करावी अशी मागणी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
यावेळी हसन मुश्रीफ आणि नंतर आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल अनिल परब यांनी आता बॅग भरायला घ्यावी असं देखील सोमय्या यावेळी म्हणाले. ठाकरे-पवार सरकार नौटंकीबाजाचं सरकार असून हसन मुश्रीफ यांच्यावर ठाकरे सरकार केव्हा कारवाई करणार असा सवाल देखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.