देहूनगरीमध्ये आजपासून मांस, मच्छी विक्री आणि नदीतील मासे पकडण्यास बंदी

575 0

पिंपरी – आज, शुक्रवार १ एप्रिलपासून श्रीक्षेत्र देहू नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा ठराव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

देहू हे तीर्थक्षेत्र असून, लाखो वारकरी देहूत दाखल होऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत असतात. वारकरी परंपरा आणि तीर्थक्षेत्र असल्याने देहूत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.आजपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट पोलीस कारवाई होणार आहे. या निर्णयामुळे देहूनगरी शुद्ध शाकाहारी बनली आहे.

याआधी ग्रामपंचायतीनेसुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि कोरोनाचाही काळ सुरू झाला. त्यामुळे प्रशासक असताना मांस, मच्छी विक्री सुरू झाली.

Share This News

Related Post

Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! बायकोला विहिरीत ढकलून स्वतःदेखील केली आत्महत्या

Posted by - July 15, 2023 0
सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur News) पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या वाद विकोपाला गेल्याने पतीने अगोदर…
Nitin Gadkari

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी धुडकावली उद्धव ठाकरेंची ‘ती’ ऑफर

Posted by - March 19, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं भाजपच्या पहिल्या यादीत नाव नवं…

यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच; 41 मालमत्ता जप्त

Posted by - April 8, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते यशवंत जाधव सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यामुळे जाधव यांच्याभोवती कारवाईचा फास आणखी आवळताना दिसत आहे. यशवंत…

BIG NEWS : BCCI च्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती, तर कोषाध्यक्षपदी आशिष शेलार

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी राजीव…
Eknath Shinde

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रौत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - February 4, 2024 0
मुंबई दि.४- संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रौत्सवात येणाऱ्या भाविकांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *