पिंपरी- बेंगलोर येथे कर्नाटक जिमनॅस्टिक संघटने तर्फे १६ वी राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.
दिनांक २६ व २८ मार्च रोजी ही स्पर्धा भरवण्यात आली होती. महाराष्ट्र संघातर्फे पिंपरी चिंचवड मधुन हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यावेळी ११ वर्षाखालील वैयक्तिक मुली प्रकारात श्रीष्टी खोडके हिने सुवर्णपदक पटकावले, तर १४ वर्षाखालील तिहेरी प्रकारात रौप्य पदक पटकावले यात परीजा क्षीरसागर, अनुष्का लुणावत व अनवी पाटील यांनी आपले सादरीकरण केले.
या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र जिम्नास्टीक संघटने तर्फे हर्षद कुलकर्णी यांची निवड झाली होती. संस्थेचे संस्थापक चैतन्य कुलकर्णी, प्रमुख प्रशिक्षक व पिंपरी चिंचवड जिम्नास्टीक संघटनेच्या उपाध्यक्षा अलका तापकीर, अध्यक्ष संजय मंगोडेकर, सचिव संजय शेलार व समस्त पालकवर्गाने खेळाडूंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.