JIO TV च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारं ‘TOP NEWS मराठी’ ठरलं देशातलं पहिलं डिजिटल चॅनेल !

836 0

पुणे- अल्पावधीतच लाखो दर्शकांच्या पसंतीस उतरलेल्या TOP NEWS मराठी डिजिटल चॅनलनं आता Jio tv च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करून आपल्या शिरपेचात आणखी एक माना तुरा खोवला आहे. Jio tv च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारं TOP NEWS मराठी चॅनेल हे देशातलं पहिलं डिजिटल चॅनेल ठरलंय.

गेली अडीच वर्षे सातत्यानं वैविध्यपूर्ण बातम्या आणि त्यांचं अचूक विश्लेषण करत डिजिटलच्या सर्व प्लॅटफॉर्मसह केबल नेटवर्कवर प्रसारित होणाऱ्या TOP NEWS मराठी चॅनेलनं अल्पावधीतच लाखो दर्शकांना आपलंसं केलं. आता हे आपलं आवडतं चॅनेल Jio tv च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होऊ लागलं असून ते आपल्या सेवेत चोवीस  तास उपलब्ध असणार आहे.

TOP NEWS मराठी चॅनेलचे विशेष मुख्य संपादक तसेच डेक्कालीप टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिर्बन सरकार यांच्या हस्ते केक कापून Jio tv लॉंचिंगचं सेलिब्रेशन करण्यात आलं. TOP NEWS डिजिटल चॅनेल लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रसारित होईल, असा विश्वास डॉ. अनिर्बन सरकार यांनी यावेळो बोलताना व्यक्त केला.

TOP NEWS मराठी चॅनेलच्या माध्यमातून दर्शकांना विविध विषयांवर आधारित माहितीपूर्ण विशेष कार्यक्रम पाहावयास मिळतील, असं मुख्यसंपादक अजय कांबळे यांनी सांगितलं. topnewsmarathi.com या वेबसाईटवरून प्रसारित होणाऱ्या वैविध्यपूर्ण बातम्या दर्शकांपर्यंत अधिकाधिक तत्परतेनं पोचवण्यावर पुढील काळात भर दिला जाईल, अशी माहिती डिजिटल संपादक विश्वास रिसबूड यांनी दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!