लोणावळा- खंडाळा घाटात अमृतांजन पुलाखाली केमिकल वाहून नेणारा टँकर उलटला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल सांडून त्याचा हवेशी संपर्क आल्यामुळे ते मेणा सारखे घट्ट झाले आहे. रस्त्याला उतार असल्यामुळे हे केमिकल दूरवर वाहत गेले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे लोणावळा शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा, खंडाळा ते द्रुतगती मार्गाच्या वलवण येथील एक्झिट पॉईंट पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.