लाडक्या गणरायाचं सर्वत्र मोठा उत्साहात स्वागत झालं असून अनेक ठिकाणी श्रद्धापूर्वक वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोपही देण्यात आला.
मात्र बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर एका कुटुंबावर पश्चातापाची वेळ आली आहे याच ठरलं सोन्याची चैन…
वाजत गाजत बाप्पाचं विसर्जन करून घरी आल्यानंतर या कुटुंबाच्या लक्षात आलं की बाप्पा सोबत चार लाख रुपये किमतीची सोन्याची चैन देखील पाण्यामध्ये वाहून गेली आहे.
कुठे घडला प्रकार?
कर्नाटकमधील बंगळुरु याठिकाणी रामय्या आणि उमादेवी या जोडप्याने दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचं विसर्जन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी बाप्पाच्या मूर्तीवर चढवलेली खरी सोनसाखळी विसर्जन करताना काढलीच नव्हती. या सोनसाखळीची किंमत 4 लाख रुपये इतकी असल्याने घडलेला प्रकार समोर आल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली.
ही सोनसाखळी शोधण्यासाठी तब्बल 10 हजार लीटर पाणी उपसण्यात आलं. तसेच 300 गणेश मूर्तींचं विसर्जन केलेल्या तलावामधील गाळ शोधून काढण्यासाठी अगदी माणसं नेमली. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी घडला आणि ही सोनसाखळी विसर्जन घाटावर काम करणाऱ्या एका मुलाने केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सकाळी सापडली. गणपतीच्या मूर्तीवर विसर्जनाच्या वेळी फुलांच्या माळा आणि इतर सजावट तशीच ठेवण्यात आल्याने ही खरी सोनसाखळी काढली नाही हे रामय्या आणि उमादेवी यांनी विसर्जन करुन घरी गेल्यानंतर समजलं.