VANARAJ ANDEKAR MURDER: वनराज आंदेकर खून प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई फरार सागर पवार साहिल दळवीला अटक

230 0

कुख्यात सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर पोलीस तपासात या प्रकरणात अनेक धक्कादायक पुढे येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचे चिरंजीव वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा आरोप त्यांची बहीण संजीवनी जयंत कोमकर, मेहुणे जयंत लक्ष्मण कोमकर व गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची मुदत संपल्याने त्यांना नुकतंच न्यायालयापुढे सादर करण्यात आलं होतं तर न्यायालयाने त्यांना 12 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी वनराज आंदेकराचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्र आणली होती, त्यापैकी चार पिस्तुल, दहा काडतूस आणि सहा दुचाकी व एक चार चाकी जप्त करण्यात आली. असल्याची माहिती त्यांनी न्यायालयापुढे सादर केली.

यानंतर आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणात कोयते, तसेच पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारेला नुकतीच अटक करण्यात आली होती. पसार झालेले आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणी विरोधी पथकाने रात्री उशीरा अटक केली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, राहुल मखरे आणि पथकाने ही कारवाई केली.

Share This News
error: Content is protected !!