काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; सर गंगाराम रुग्णालयात उपचारार्थ दाखल

614 0

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. जानेवारी महिन्यातच त्यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे आठ दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ताप आणि छातीतील संसर्गामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गुरुवारी त्यांना ताप आणि छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल असून सध्या चेस्ट मेडिसिन विभागाचे सीनियर कन्सल्टंट डॉक्टर आरुप बसू यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!