पुणे : कसब्यामध्ये तीस वर्षानंतर भाजपाला सत्ता गमवावी लागली. काँग्रेसचे धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध कडवं आव्हान उभं केलं होतं. त्याच पद्धतीने आता लोकसभा निवडणुकीतही भाजपला महाविकास आघाडीच कडवं आव्हान असणार आहे. 2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे तर 2019 मध्ये खासदार गिरीश बापट यांना पुणेकरांनी आपला कौल दिला होता.
दरम्यान 2019 मध्ये भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचंड मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला होता. परंतु आता एकंदरीत परिस्थिती बदललेली दिसून येते आहे.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदारांचे राजकीय मतपरिवर्तन झालेले काही प्रमाणात दिसून येते आहे. वडगाव शेरी आणि हडपसर मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. तर कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी हा पराभव अगदी काठोकाठ झाला आहे. त्यामुळे पुण्यावरून भाजपची निसटती लाट असल्याच लक्षात येते आहे. आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत देखील धंगेकर जायंट क्लिअर ठरतील अशा चर्चा राजकीय आणि सामान्यांमध्ये रंगत आहेत.