नागपूर- ईडीने पाच तास चौकशी केल्यानंतर नागपूरचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यांचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
पार्वतीनगर भागातील सतीश उके यांच्या निवासस्थानी आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी स्वतः उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरात होते. पाच तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीनं दोघांनाही ताब्यात घेतले. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केला.
आज पहाटे साडेपाच वाजता आम्ही झोपेत असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. आमचे सर्वांचे मोबाईल जमा केले. तुम्ही फक्त लॅट्रीन, बाथरूमला जाऊ शकता. मुलांना शाळेत जाण्याची त्यांनी परवानगी दिली. अशी माहिती उके यांच्या कुटुंबीयांनी दिली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके आणि प्रदीप उके यांच्या खोल्या चेक करायच्या असून काही कागदपत्र जप्त करायचे असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भरपूर केसेस केलेल्या आहेत. त्या चालू आहेत. एका प्रकरणाचा निकाल दोन-चार दिवसांत लागणार आहे. त्यासाठी त्यांनी तसेच पुढे भविष्यात आणखी काय करणार आहे. त्यासंबंधी सतीश उके यांचा लॅपटॉप मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती उके यांच्या कुटुंबीयांनी दिली.