नवी दिल्ली- देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे एक लाख 61 हजार 386 नवीन रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोनाचे 3.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, देशातील कोरोनाचा दैनंदिन सकारात्मकता दर आता 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे एक लाख 61 हजार 386 नवीन रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोनाचे 3.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 524 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 लाख 35 हजार 481 वर गेलीय तर आतापर्यंत 73 लाख 35 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3221 वर पोहोचली आहे. तर,1689 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 164.89 कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे 11.48 कोटी पेक्षा जास्त डोस आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 167 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 57 लाख 42 हजार 659 लसींचे डोस देण्यात आले. तर, आतापर्यंत 167 कोटी 29 लाख 42 हजार 707 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीचे 164.89 कोटीहून अधिक डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे 11.48 कोटी पेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत.