मुंबई – शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं खळबळजन खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवण्यास मला भाग पाडल्याचा दावा पीडितने केला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील ‘दूध का दूध पानी का पानी’ असे म्हणत चित्र वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्यावर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडितेच्या आरोपांचे खंडन केले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, फेब्रुवारीपासून एकट्या लढणाऱ्या पीडितेसोबत मी उभी राहिले. तेंव्हा कुणी तिच्या मदतीला उभे राहिले नव्हते. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटतोय.
रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले….खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात
Feb पासून एकटी लढणार्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला..
मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे pic.twitter.com/wtHn1s3bz9— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 12, 2022
चित्रा वाघ म्हणाल्या, ” पीडितेने मला जी माहिती दिली ती कोर्टासमोर इन कॅमेरा दिलेली आहे. त्यामुळे मला दिलेली माहिती खोटी असेल तर कोर्टासमोर दिलेली माहिती देखील खोटी आहे का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. कोर्टासमोर दिलेली माहिती खोटी असेल तर मला दिलेली माहिती देखील खोटी आहे असे चित्रा वाघ म्हणाल्या.
‘याबाबतीत मुलीने स्वत: मला पत्र पाठवलं आहे. तिचं पोलीस ऐकत नव्हते त्यावेळी आम्ही तिला मदत केली. तसंच आम्ही त्या पीडितेसाठी जे काही करता येईल ते केलं. या मुलीच्या तक्रारीत सगळ्यात पहिल्यांदा मुलगी आमच्याकडे आली. मी स्वत:ला संपवते असं ती म्हणत होती. मी तिचं ते पत्र पुण्यातील सीपींना पाठवलं. माझ्यावर पीडितेने केलेल्या आरोपांची चौकशी करा. चित्रा वाघ सगळ्या चौकशीसाठी तयार आहे. माझ्याकडे असलेले पुरावे, पिडीतेसोबत झालेले संभाषण, मेसेज हे सर्व तपास यंत्रणांना देण्यासाठी मी तयार आहे असे चित्रा वाघ म्हणाल्या.
“पीडितेच्या आरोपानंतर सरकार नवीन एफआयर तयार करेल, ज्यामध्ये मी कशी अडकेन हे पाहिलं जाईल, पण मला सत्ताधाऱ्यांना सांगायचंय, की हे सगळं करुन तुम्ही माझा आवाज बंद कराल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे. माझ्या घरावर हल्ला करुन झाला. आता मला अशा केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करताय, पण माझी तयारी आहे. जिथे बोलवाल तिथे चौकशीला येते, पण तुम्ही माझा आवाज बंद करु शकत नाही”, असं रोखठोक प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.