पुण्यात प्रेयसीचे डोके भिंतीवर आपटून खून, आरोपी गजाआड

354 0

पुणे- प्रेमसंबंधातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून केला. त्यानंतर चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या अंगावरील दागिने,मोबाईल चोरून पळ काढला. ही घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सुनीता बाळू कदम असे खून झालेल्या महिलेचे नाव असून किसन सीताराम जगताप ( वय ४६ रा नारळीचा मळा ता.पुरंदर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सुनीता हिच्या विवाहित मुलीने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किसन आणि सुनीता यांचे सुनीत गेल्या १० ते १२ वर्षापासून संबंध होते. सुनीता त्याला लग्नासाठी तगादा लावत होत्या. किसन याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते. त्या पैशासाठी किसन याने सुनीताचा खून केला. आरोपी किसान याने शनिवारी (दि. ९) रात्री साडेअकरा वाजता एक कोल्डड्रिंकची बाटली घेतली. त्यात झोपेच्या गोळ्या टाकून सुनीताला पाजले. तिच्याशी गप्पा मारण्याचे नाटक केले. तिला गुंगी येताच तिचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला. त्यानंतर सुनीताच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल एटीएम कार्ड घेऊन पळून गेला.

ही घटना सुनीता यांच्या मुलीला रविवारी सकाळी लक्षात आला. तिने त्वरित हडपसर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरु केला. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने आरोपी किसनला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करत आहेत.

Share This News

Related Post

सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील

Posted by - April 21, 2023 0
पुणे: सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

लालमहालातील ‘त्या’ लावणीच्या व्हिडीओवर जितेंद्र आव्हाड संतप्त

Posted by - May 21, 2022 0
पुणे- पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालामध्ये अलीकडेच एका लावणीचे शूटिंग करण्यात आले. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी या लावणीवर नृत्य करण्यात आले.…

PUNE POLICE : पुणे पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Posted by - October 29, 2022 0
पुणे : पुणे पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी…
Hanuman

Hanuman : ‘आदिपुरुष’नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘हनुमान’; ‘या’ दिवशी होणार रिलीज

Posted by - July 1, 2023 0
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या ‘हनुमान’ (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *