बियर पिण्यात पुणेकर अव्वल ! २१३ कोटींने महसूल वाढला !

120 0

पुणे – पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. आता पुणे तिथे पिणे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण पुणेकरांनी यंदाच्या उन्हाळ्यामध्ये बिअरला अधिक पसंती दिली असून तब्बल 30 लाख लिटरने बियरच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे 213 कोटींनी महसुलात वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील मद्यविक्री 2021-22 मध्ये परत वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याबाबत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीजचे अध्यक्ष दीपक रॉय म्हणाले की, “महाराष्ट्रातील मद्यविक्री 2021-22 मध्ये परत वाढली आहे, विशेष म्हणजे 2020-21 च्या कोरोनाच्या काळात 2020 मध्ये, दारूची दुकाने आणि रेस्टॉरंट काही दिवस बंद राहिले, त्यानंतर मर्यादित वेळेसह पुन्हा उघडल्यानंतर उद्योगाला मोठा फटका बसला होता. अल्कोहोलच्या काही विभागांमध्ये वाढ मंदावली असली तरी, इतर बाजारपेठांच्या तुलनेत महाराष्ट्रातील व्यवसाय 2021-22 मध्ये अधिक वेगाने परत आल्याचे दिसते.”

2021-22 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सर्वाधिक महसूल मिळवला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार बिअर, देशी दारू आणि वाईनची विक्री गेल्या आर्थिक वर्षात महामारीच्या काळात पहिल्यांदाच वाढली होती. 2021-22 मधील वर्षभरातील भारतीय बनावटीची विदेशी दारू विक्रीने 2019-20 मधील विक्रीला देखील मागे टाकले होते. कोरोना भारतात येण्यापुर्वी तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात बिअर आणि देशी दारूची विक्री कमी झाली. 2020-21 आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021-22 मध्ये बिअरच्या विक्रीत अंदाजे 14 टक्के वाढ झाली, परंतु 2019-20 च्या तुलनेत सुमारे 22 टक्के घसरण झाली.

Share This News

Related Post

धक्कादायक : खराडीत खडक फोडण्यासाठी लावलेल्या सुरुंगाचा स्फोट ; एका मजुराचा मृत्यू, एक जखमी

Posted by - February 7, 2023 0
पुणे : बांधकाम प्रकल्पात खोदकाम केल्यानंतर सापडलेला खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर उडालेले दगड लागून…

को -ऑपरेटीव्ह संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपयोगी पडतात – खासदार श्रीरंग बारणे

Posted by - August 26, 2022 0
पुणे : पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपू ही दिले नाही.…

मोठी बातमी! रवी राणा व नवनीत राणा यांना अटक

Posted by - April 23, 2022 0
सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत…
Pune News

Pune News : केस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण

Posted by - September 11, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीने केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या पतीने…
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 1 ठार 3 जण जखमी

Posted by - November 12, 2023 0
वाशिम : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) होणारे अपघात काही थांबायचे नाव घेईना. ऐन दिवाळीच्या तोंडावर शनिवारी मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *