लाल महालात लावणीचे शूटिंग केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा

401 0

पुणे- लालमहालात विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड संघटनेने तक्रार केली होती.

नृत्यांगना वैष्णवी पाटील या गाण्याचे शूटिंग करणारे कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील ऐतिहासिक लाला महालात सध्या गाजत असलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर नृत्यांगना वैष्णवी पाटील नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या प्रकारचा अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला. संभाजी ब्रिगेडने याचा तीव्र शब्दात निषेध केला. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केले आहे. लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असताना हे शूटिंग कसे करण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे. सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप केला जातोय.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील निषेध व्यक्त करत अशा प्रकारे पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका अशा आशयाचे ट्विट केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!