बेंगळुरू- बेंगळुरूमधील विविध शाळांमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा मेल आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने सहा शाळा ताब्यात घेतल्या असून बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून बॉम्बचा शोध घेतला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत दोन शाळांची तपासणी करण्यात आली असून अजूनपर्यंत काहीही सापडले नाही. प्रथमदर्शनी फसवणूक करण्यासाठी हे मेल केल्याचे पोलिसांचे म्हणणे असून पोलीस बॉम्बचा शोध घेत आहेत.
शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुब्रह्मण्येश्वर राव यांनी सांगितले की दिल्ली पब्लिक स्कूल गोपालन इंटरनॅशनल स्कूल , महादेवपुरा , न्यू अकादमी स्कूल मराठाहल्ली,एबेनेझर इंटरनॅशनल स्कूल इलेक्ट्रॉनिक्स सिटी, सेंट व्हिन्सेंट फ्लोटी स्कूल नूर आणि इंडियन पब्लिक स्कूल , गोविंदपुरा या शाळांना ईमेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जे विद्यार्थी परीक्षेसाठी शाळेत आले होते , त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.