आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

805 0

गोंडा – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या आश्रमात आता आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. बहराइच रोडवर असलेल्या आसारामबापूच्या आश्रमात मागील अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. ही मुलगी ५ एप्रिलपासून बेपत्ता होती.

गाडीतून दुर्गंधी येऊ लागल्याने आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी गाडीचा दरवाजा उघडला असता त्यात मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवला आहे. तसंच संबंधित आश्रम सील करून त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मृत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी मंगळवारपासून (5 एप्रिल) बेपत्ता होती. घराजवळच्या परिसरात तिला शोधण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला; मात्र त्यात यश आलं नाही. शेवटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

मुलीचे वडील तीन वर्षांपासून बेपत्ता

मुलीचे वडीलही गेल्या तीन वर्षांपासून गूढपणे बेपत्ता झाले होते. त्याचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या आश्रमाला कुलूप लावण्यात आले आहे. आश्रमात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

Share This News

Related Post

दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात खमंग कुरकुरीत ‘शेव रेसिपी’

Posted by - October 11, 2022 0
दिवाळीमध्ये गोड, तिखट फराळाचा आस्वाद घेताना त्यामध्ये शेव तर असायलाच हवी. या शेवेमध्ये देखील अनेकांचे आवडीचे प्रकार देखील असतात. जसे…
Yavatmal News

Yavatmal News : यवतमाळ हळहळलं ! पतीच्या ‘त्या’ छळाला वैतागून विवाहितेने 2 चिमुकल्यांसह घेतला जगाचा निरोप

Posted by - August 17, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Yavatmal News) माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत…

शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने भाजपाला मदत केली म्हणून… , भाजपच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Posted by - June 11, 2022 0
मुंबई- ज्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकारण निर्माण झाले होते ती सहावी जागा मिळवत भाजपने विजयाचे सेलिब्रेशन केले. एकीकडे भाजपाने घोडेबाजार…

थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग, चोरीसाठी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता

Posted by - January 25, 2022 0
पुणे- पुण्याजवळील थेऊर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना…

…अखेर ‘त्या’ वादग्रस्त घोषणेप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - September 25, 2022 0
पुणे: देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरून गुरुवारी पी.एफ.आय. संघटनेच्या अनेक कार्यालयांवर ठिक ठिकाणी NIA आणि ईडीकडून छापे टाकण्यात आले. पुण्यातून सुद्धा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *