पुणे- कोळसा तुटवड्यावर येत्या दोन ते तीन दिवसात तातडीने उपाययोजना न झाल्यास राज्यावर लोडशेडिंगचे संकट येऊ शकते असा इशारा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विजेची मागणी व उपलब्धता यावर चर्चा झाली असून राज्यात निर्माण झालेल्या कोळसा संकटावर येत्या 2-3 दिवसात तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत तर राज्याला ‘लोडशेडींग’चा सामना करावा लागू शकतो असं मत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.
राज्यात लोडशेडिंगचे संकट निर्माण होण्यामागे काय आहेत कारणं
अनेक वीज निर्मितीकेंद्रांवर 2-3 दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यामुळे महानिर्मितीला हा तुटवडा जाणवतोय. महाजनको कंपनीच्या आकडेवारीनुसार राज्यात विजेची एकूण गरज 20 हजार 800 मेगावॉट एवढी आहे. यापैकी 5 हजार 800 मेगावॉट वीज ही कोळशावर आधारित वीजप्रकल्पात तयार केली जाते.
आता मात्र 28 हजार मेगावॉट विजेची मागणी निर्माण झाली आहे. दोन दिवसात हीच मागणी 30 हजार मेगावॉटवर जाण्याची शक्यता दर्शवली जातीय. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे राज्यावर भारनियमनाचं संकट निर्माण झालं आहे. वीज निर्मितीमध्ये महत्वाच्या असलेल्या कोयना विद्युत प्रकल्पात विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यात वीज निर्मितीच संकट उभं राहिलं आहे. येत्या 2-3 दिवसात तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाही तर राज्याला लोडशेडींगचा सामना करावा लागू शकतो असे मत राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय. त्यामुळं आता आगामी काळात राज्याला लोडशेडिंगचा सामना करावा लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.