माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

459 0

मुंबई – सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांची जेजे हॉस्पिटलमधून सुटका झाली. त्यानंतर आर्थर रोड जेल येथून देशमुख यांना ताब्यात घेतले असून कोर्टात हजर केले जाणार आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपास यंत्रणेला दिली होती. त्यानुसार सीबीआयने सचिन वाझेसह पालांडे आणि शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी (4 एप्रिल) सीबीआयकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख अचानक जेजे रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांना सीबीआय त्यांचा ताबा घेऊ शकली नाही.

मात्र मंगळवारी (5 एप्रिल) देशमुखांना डिस्चार्ज दिल्याने सीबीआय ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु या याचिकेवरील सुनावणीआधीच सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले.

1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र होतं. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलीय, ज्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

Share This News

Related Post

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्बसदृश्य आवाजाने धमाका; अग्निशमन दलाचे मॉक ड्रिल

Posted by - October 13, 2022 0
पुणे : आज जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉक ड्रिल…
OTT And Anurag Thakur

OTT Rule : सरकारने OTT साठी बनवले ‘हे’ नियम; शिवीगाळ आणि अश्लीलतेवर येणार बंदी

Posted by - July 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल लोक थिएटर आणि टीव्हीपेक्षा OTT प्लॅटफॉर्मला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. ते मोठ्या प्रमाणात…

अखेर! आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा 15 जूनला निश्चित

Posted by - June 6, 2022 0
आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीस आदित्य ठाकरेंचा दौरा १० जून रोजी निश्चित…
Satara News

Satara News : घराच्या वास्तुशांतीनिमित्त लाईटीचे तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू

Posted by - September 1, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये घराच्या वास्तुशांतीनिमित्त लाईटीचे तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *