Breaking News ! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट, भेटीचे कारण गुलदस्त्यात

212 0

नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान १२.२० ते १२.४० अशी २० मिनिटे चर्चा झाली. मात्र या भेटीमधील तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चा होते. आताच्या भेटीचं टाईमिंगही महत्त्वाचं आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप होत आहेत. अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरु आहेत. मंत्री तुरुंगात जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याचे मानले जात आहे. या दोन नेत्यांच्या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ही बैठक अचानक झालेली नाही तर पूर्वनियोजित बैठक असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील एखाद्या विकासकामांबाबत ही बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २० मिनिटांच्या बैठकीत राजकारणावर कितपत चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी रात्री भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीला महाराष्ट्राशी संबंधित अनेक पक्षांचे नेते, महाविकास आघाडीसह भाजपचे अनेक आमदारही उपस्थित होते. या मेजवानीत मंगळवारी ईडीने कारवाई केलेले शिवसेनेचे नेते संजय राऊतही दिसले. राऊत आणि पवारही मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. अशा परिस्थितीत पवारांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट अनेक राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. या मेजवानीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहिल्यामुळे काही जण आश्चर्य व्यक्त करताना दिसले. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात कोणती खिचडी शिजते, हे येणारा काळच सांगू शकेल.

Share This News

Related Post

जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनाला येताय; तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Posted by - December 25, 2022 0
चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर संपूर्ण जगात सध्या घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व…

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

Posted by - July 12, 2022 0
पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित…
Ahmadnagar News

Ahmadnagar News : धक्कादायक! अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक

Posted by - July 22, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील (Ahmadnagar News) खरे कर्जुले गावामधून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा…
Uddhav Thackeray

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा…

TOP NEWS SPECIAL REPORT : लोकवर्गणीतून आमदार, खासदार झालेला लोकनेता ‘राजू शेट्टी’…!

Posted by - September 15, 2022 0
TOP NEWS SPECIAL REPORT : राजू शेट्टी महाराष्ट्राच्या राजकारणातील विशेषतः शेतकरी चळवळीतील मोठं नाव आंदोलन असो वा मोर्चे राजू शेट्टी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *