उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणाचा कुऱ्हाडीने वार करत खून

567 0

पुणे- उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

युवराज बाबुराव जाधव (34) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील बाबुराव माणिक जाधव (55) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गणेश सुरेश खरात (35, रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांची दूध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये उसने घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने दिलेले पैसे मागत होता.

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्‍यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खरात तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : “मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे”; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिले ‘हे’ उत्तर

Posted by - August 11, 2023 0
बॉलीवूड चा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आपल्या आगामी काळात येणाऱ्या ” जवान ” या चित्रपटामुळे खूप…
Nanded News

Nanded News : सुटीवर आलेल्या जवानाकडून गर्भवती पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलीची हत्या

Posted by - September 13, 2023 0
नांदेड : नांदेड जिल्ह्यातून (Nanded News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भारतीय सैन्यदलातील एका जवानाने आपल्या गर्भवती पत्नी…

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळणार सातवा वेतन आयोग

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएमपीएमएलच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका…

बाळूमामाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; आठ जण गंभीर जखमी

Posted by - March 5, 2023 0
बाळूमामा यांच्या पालखी तळावरून दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन घेऊन घरी…
crime satara

शेतात रस्ता बनवण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

Posted by - May 11, 2023 0
सातारा : कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी या ठिकाणी शेतातून रस्ता नेण्याच्या कारणावरून दोन कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *