पुणे- पुणे शहरातील राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेसचा पाणीपुरवठा महापालिकेकडून तोडण्यात आला आहे. तब्बल २ कोटींची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
शहरात सद्यस्थितीला पाणीपट्टी थकबाकीदारावर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचा फटका आगाखान पॅलेसला बसला आहे. राष्ट्रीय स्मारक असलेल्या आगाखान पॅलेसचा ताबा पुरातत्व विभागाकडे आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने त्याची पाणीपट्टी भरणे अपेक्षित होते. मात्र वारंवार मागणी करूनही अद्याप पाणीपट्टी देण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली आहे.
कामगार वसाहत, बागेला एकूण तीन नळजोड देण्यात आले आहेत. महापालिकेच्या कारवाईमुळे पॅलेसच्या आवारातील बाग सुकून चालली आहे. पाण्याशिवाय झाडे वाळून गेली आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, थकीत पाणीपट्टीबाबत पुरातत्त्व विभागाकडे वारंवार मागणी करूनही ते न भरण्यात आल्याने नाईलाजावास्तव नळांचा पुरवठा बंद करत कारवाई करावी लागली. याबरोरच उन्हाची वाढटी तीव्रता लक्षात घेत महापालिका उद्याने तसेच बांधकामांसाठी स्वच्छ केलेले सांडपाणी वापरत आहे. तेच पाणी स्मारकाच्या बागेसाठी वापरणे संयुक्तिक होणार आहे. त्यामुळे या दोन्ही कारणांसाठी हा पुरवठा खंडीत केला आहे. अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
आगाखान पॅलेसचा इतिहास काय आहे ?
आगाखान पॅलेसमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी सहावर्षे राजकैदी म्हूणन राहिले होते. या सहावर्षाच्या काळात महात्मा गांधी यांनी तिथे बाग फुलवली होती.मात्र आज पाण्याच्या अभावामुळे बागेतील झाले सुकली आहेत.तिसरे सुलतान मोह्हमद शाह आगा खान यांनी याची निर्मिती केली आहे. संपूर्ण आगाखान पॅलेस हा 19 एकरामध्ये विस्तारलेला आहे. इस्लामिक बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या पॅलेसची निर्मिती 1892 ला झाली आहे. त्यावेळी तब्बल 12 लाख रुपये निर्मितीसाठी खर्च करण्यात आला होता. त्यानतंर 1962 ला पॅलेस भारत सरकारला दान देण्यात आला आहे.