ब्रेकिंग न्यूज, हैद्राबादमध्ये गोदामाला भीषण आग, 11 जण जिवंत जळाले

187 0

तेलंगणा- हैदराबादच्या बोयागुडा भागात एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जण जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण बिहारचे असून येथील रद्दीच्या गोदामात काम करायचे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत असून सुमारे 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेच्या वेळी मजूर गोदामात झोपले होते. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. भीषण आग लागल्यामुळे एक भिंत कोसळली, त्यामुळे येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. सध्या एक जणाला बचावण्यात आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गांधी नगरचे एसएचओ मोहन राव यांनी सांगितले की, गोदामात 12 लोक उपस्थित होते. यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण जिवंत बचावला आहे. बचावकार्य वेगात सुरु आहे. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.

हैदराबादचे डीसीपी सेंट्रल झोन यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल. मृत्युमुखी पडलेले सर्व बिहारचे रहिवासी आहेत.

Share This News

Related Post

दुर्दैवी : इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्फोटामध्ये 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Posted by - October 3, 2022 0
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव पाहता अनेक वापरकर्त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे पसंती दर्शवण्यास सुरुवात केली होती. परंतु आत्तापर्यंत इलेक्ट्रिक…

Police Commissioner Amitabh Gupta : बोपदेव घाट परिसरात लुटमार करून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - November 15, 2022 0
पुणे : कोंडवा पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सनी भरत पवार वय (वर्ष 22) याच्यावर…
Milk

Milk Dairy : शेतकऱ्यांना दिलासा; दुधाच्या दराबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Dairy) एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये…

जुन्नरमध्ये व्यावसायिकाची हत्या ! मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला

Posted by - April 8, 2023 0
व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात उघडकीस आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *