#ACIDENT : गुगल मॅपने चुकवला रस्ता ! सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर काळाचा घाला, अपघातात तरुणीचा मृत्यू

33959 0

पुणे : योग्य मार्ग माहित नसला की आपण सर्रास गुगल मॅपची मदत घेत असतो. पण सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर गुगल मॅपने रस्ता शोधणे जीवावर बेतले आहे. या अपघातात तरुणीचा अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्युमुखी झालेली तरुणी ही खराडी भागातील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होती. तर ती तिच्या मित्रा समवेत सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते असे समजते. यावेळी वानवडीला जाण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेऊन रस्ता शोधत असताना मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ते आले.

यावेळी कात्रज बोगद्याकडे जात असताना रस्ता चुकीचा असल्याचे तिच्या मित्राच्या लक्षात आले ते चुकून महामार्गावर आले होते. कात्रज बोगद्याजवळून वळण घेत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जबर धडक दिली. यामध्ये तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर ट्रकचालक तिथून न थांबताच पसार झाला आहे. या प्रकरणी नटराज यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या ट्रकचालकाचा तपास करत आहे.

Share This News
error: Content is protected !!