#ACIDENT : गुगल मॅपने चुकवला रस्ता ! सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर काळाचा घाला, अपघातात तरुणीचा मृत्यू

33861 0

पुणे : योग्य मार्ग माहित नसला की आपण सर्रास गुगल मॅपची मदत घेत असतो. पण सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर गुगल मॅपने रस्ता शोधणे जीवावर बेतले आहे. या अपघातात तरुणीचा अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्युमुखी झालेली तरुणी ही खराडी भागातील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होती. तर ती तिच्या मित्रा समवेत सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते असे समजते. यावेळी वानवडीला जाण्यासाठी त्यांनी गुगल मॅपची मदत घेऊन रस्ता शोधत असताना मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ते आले.

यावेळी कात्रज बोगद्याकडे जात असताना रस्ता चुकीचा असल्याचे तिच्या मित्राच्या लक्षात आले ते चुकून महामार्गावर आले होते. कात्रज बोगद्याजवळून वळण घेत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जबर धडक दिली. यामध्ये तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर ट्रकचालक तिथून न थांबताच पसार झाला आहे. या प्रकरणी नटराज यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या ट्रकचालकाचा तपास करत आहे.

Share This News

Related Post

Akola News

Akola News : अकोला हादरलं ! कुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा झोपेतच मृत्यू

Posted by - July 31, 2023 0
अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अकोला (Akola News) जिल्ह्यातील महान येथे पती-पत्नीचा कुलरचा…

बॉलिवूड तारे-तारका, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आयपीएलची सांगता

Posted by - May 27, 2022 0
अहमदाबाद- आयपीएल 2022 चा अंतिम सामना हमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Posted by - January 10, 2024 0
पुणे : सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षांचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील (Pune News) सावित्रीबाई फुले पुणे…

आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - May 27, 2022 0
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसीस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि…
RBI

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Posted by - February 7, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वेळोवेळी देशातील इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *