अकोला- नांदेड महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टॅंकरचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

158 0

अकोला- अकोला नांदेड महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टँकरच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी घडला. या अपघाताची दृश्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसताना या व्हिडिओमधून पाहायला मिळतो.

पुण्यावरुन यवतमाळला जाणारी खासगी बस आणि समृद्धी महामार्गावर जाणारा पाण्याचा टॅंकर यांचा आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. वाशिम शहराजवळ असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये दोन्ही वाहनांचे चालक आणि खासगी बसचा क्लिनर यांचा समावेश आहे. खासगी ट्रॅव्हल्समधील 7 प्रवाशी तर टँकरमधील एक जण जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर वाशिम शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share This News

Related Post

शिवसेनेचे उपनेते यांच्या घरावर आयकर विभागाची धाड, काय आहे प्रकरण ?

Posted by - February 25, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. भाजप नेते किरीट…
Bailgada

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ; बैलगाडा शर्यतींना दिली परवानगी

Posted by - May 18, 2023 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत (bullock cart race) महत्वपूर्ण असा निकाल दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बैलगाडा शर्यतींचा…

लाऊडस्पीकरवरून अजान हा मूलभूत अधिकार नाही, अलाहाबाद कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- धार्मिक स्थळांवरून भोंगे हटविण्याच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेश, महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात…
Crime News

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Posted by - January 7, 2024 0
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातून एक खळबळजनक (Crime News) घटना समोर आली आहे. दापोलीत समुद्र किनाऱ्यावर बारावीत शिकणाऱ्या तरुणीचा मृतदेह आढळून…

Breaking News ! १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, उद्या इयत्ता १० वीचा निकाल जाहीर होणार

Posted by - June 16, 2022 0
मुंबई- परीक्षेचा निकाल कधी लागणार यांची उत्सुकता १० वीच्या विद्यार्थ्यांना लागली आहे. आता त्यांच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे उद्या राज्य माध्यमिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *