पुणे- पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले असून काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता पुणे महापलिका निवडणुकीत लक्ष घालणार, असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी आपली रणनीती व फौज उभारण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेसला एक कोअर कमिटी करून देण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकीची रंगत यायला सुरू झाली आहे. कोअर कमिटीचे मुख्य समन्वयक म्हणून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नियुक्ती करण्यात आली असून रमेश बागवे यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.
एकूण 15 जणांचा या कोअर कमिटीमध्ये समावेश आला आहे. अशी आहे काँग्रेसची कोअर कमिटी-
संग्राम थोपटे- मुख्य समन्वयक, संजय राठोड- सहसमन्वयक, रमेश बागवे- अध्यक्ष तर मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, दीप्ती चवधरी, आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, पूजा आनंद, मुख्तार शेख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.