श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने मानले भारताचे आभार

112 0

कोलंबो- श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने आपल्या देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटाबाबत सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना जयसूर्या यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी देशातील परिस्थिती “दुर्दैवी” असल्याचे वर्णन केले. तसेच भारताचे आभार मानले आहेत.

सनथ जयसूर्याने भारताचे वर्णन आपला मोठा भाऊ असे केले आहे.तो म्हणाला की, आपल्या देशाचा शेजारी आणि मोठा भाऊ म्हणून भारताने आपल्याला नेहमीच मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. आमच्यासाठी, सध्याच्या परिस्थितीमुळे जगणे सोपे नाही. भारत आणि इतर देशांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याची आम्हाला आशा आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयसूर्या म्हणाला की, देशातील जनता अनेक महिन्यांपासून या परिस्थितीतून जात आहे. लोक या परिस्थितीतून जात आहेत हे दुर्दैवी आहे. ते असे जगू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गॅसचा तुटवडा असून तासनतास वीजपुरवठा होत नाही. श्रीलंकेतील लोकांना दैनंदिन वापरासाठी जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. आम्हाला या गोष्टी होताना बघायच्या नाहीत. डिझेल, गॅस, दूध पावडरसाठी तीन ते चार किमीच्या लांबलचक रांगा आहेत. हे खरोखरच दुःखद आहे.

लोकांनी आता श्रीलंका सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर त्याचे रूपांतर आपत्तीत होईल. देशातील आर्थिक संकटासाठी जयसूर्याने विद्यमान सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले की, सध्या ही जबाबदारी सरकारची आहे. या सरकारवर श्रीलंकेतील लोकांचा खूप विश्वास होता. सध्याच्या सरकारने जे काही केले ते चांगले झालेले नाही.

Share This News

Related Post

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ई बाईकवर प्रवास 

Posted by - March 13, 2022 0
पुणेकरांसाठी आजचा रविवार राजकीय वार ठरला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 31 विकासकामांची लोकार्पण,भूमिपूजन तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

नेतृत्व विकासातून महिला सक्षमीकरणाचा आलेख वाढेल – माजी निवडणुक आयुक्त व्ही.एस. संपत 

Posted by - April 24, 2022 0
महिलांमधील सुप्त गुण जागृत करून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे प्रचंड नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते विकसित केल्यास…

‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’ पटोलेंचे वादग्रस्त विधान

Posted by - January 24, 2022 0
नाशिक- आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आणखी एक विधान पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष…

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयीन…
Karuna Sharma

Karuna Sharma : करुणा शर्मा यांनी बावनकुळेंची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 30, 2023 0
बीड : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *