पुणे- अनेक देशांना करोनाच्या चौथ्या लाटेचा फटका बसला आहे. तर चीनमध्ये पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. भारतातही करोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याबाबत मोठे विधान केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भारतात भविष्यात करोनाची चौथी लाट आली तर ती सौम्य असेल. भारताने योग्य लस निवडल्यामुळेच आज भारतात करोना रुग्णसंख्या इतकी कमी आहे. अनेक देशांमध्ये बूस्टर डोस देण्यात येत असून पुढील काही दिवसात बूस्टर डोसबाबत केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. बूस्टर डोस घेण्याची वेळ आलेली असल्याचे आदर पुनावाला यांनी सांगितले.
दरम्यान, भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून महाराष्ट्रात तर सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. असून मास्कसक्तीही करण्यात आलेली नाही. पर्यायी इंधनावर चर्चा करण्यासाठी आयोजित परिषदेसाठी आदर पूनावाला उपस्थित होते.