Manoj Jarange Patil : ‘माझे हे शेवटचे उपोषण…’ मनोज जरांगेनी सरकारला दिला इशारा
जालना : सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. प्रकृती खालवल्यामुळे स्थानिकांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी पहाटे अडीच वाजता उपचार घेतले. डॉक्टरांनी पहाटे मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावली. प्रकृती स्थिरावल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.