मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Cyclone Update) सध्या भारतात चक्रीवादळाचं मोठं संकट घोंगावत आहे. या चक्रीवादळाचं नाव ‘रेमल’ असं ठेवण्यात आलं आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ रविवारी रात्री पश्चिम बंगालमधील सागरी बेटे आणि खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. रेमल हे भारतात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पहिलं चक्रीवादळ आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ रविवारी 110 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगानं किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील सर्व विमान उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. तसेच येथील नागरिकांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार 26 आणी 27 मे रोजी पश्चिम बंगालच्या उत्तर भागात तसचे ओडिशाच्या किनारपट्टी भागात आणि भारताच्या नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असून, या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यात पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.