आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नवनिर्माण यात्रा सुरू असून या नवनिर्माण यात्रेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लातूरमध्ये मनसेच्या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
या अगोदर सोलापूर मध्ये पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन उमेदवार जाहीर केले होते यामध्ये शिवडी मतदारसंघातून मनसे नेते बाळा नांदगावकर तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली आहे
त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूर ग्रामीण मतदार संघतून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली असून आता संतोष नागरगोजे यांचा काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्याशी सामना होणार आहे.
कोण आहेत संतोष नागरगोजे?
संतोष नागरगोजे यांच्याकडे लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून मनसेची जबाबदारी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही संतोष नागरगोजे यांनी काम पाहिलाय याबरोबर प्रदेश सरचिटणीस पदी ही संतोष नागरगोजे यांनी काम पाहिलं असून राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन संतोष नागरगोजे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला