शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नेत्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या असून यामध्ये वसंत मोरे यांची नियुक्ती राज्य संघटक पदी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिव पदी संजय लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील वसंत मोरे यांच्यासह शिवसेनेचे चार संघटक जाहीर करण्यात आले.
ललिता पाटील मुकेश साळुंखे यांची ही राज्य संघटक पदी नियुक्ती करण्यात आली असून वरून सरदेसाई यांच्याकडे वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे..