44 उमेदवारांची यादी काढली आणि दोन तासातच परत घेतली; जम्मू-काश्मीर निवडणुकीवरून भाजपात काय घडतंय?

96 0

श्रीनगर: कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असून या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षासह पीडीपी बरोबरच प्रमुख राजकीय पक्ष हे जम्मू काश्मीर विधानसभेच्या प्रचाराला देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच आज भाजपाकडून 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती मात्र अवघ्या दोन तासातच ही यादी मागे घेण्यात आली आहे.

भाजपने सकाळी 10 वाजता 44 नावांची यादी जाहीर केली. 12 वाजण्याच्या सुमारास पक्षाने आपली यादी सोशल मीडिया हँडलवरून हटवली.

यानंतर पहिल्या यादीत 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 3 टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल लागतील

पक्षांतर्गत संघर्षामुळे ही 44 उमेदवारांची यादी मागे घेण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले असून अवघ्या दोन तासातच भाजपाकडून 44 ऐवजी 15 उमेदवारांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाच्या 2014 पासून आतापर्यंत यादी जाहीर करून ती मागे घेण्याची भाजपाची पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Share This News

Related Post

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

Posted by - June 30, 2022 0
राज्यात सुरू असलेल्या अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींवर अखेर पडदा पडला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासह विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा…

कोरोनाची पुन्हा भीती : “चीन मधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमणार का?” अजित पवारांचा सभागृहात सवाल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 21, 2022 0
हिवाळी अधिवेशन नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष…

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर अज्ञात तरुणाने काळे फासले

Posted by - February 1, 2022 0
इंदूर- एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात तरुणाने काळं फासलं. ही धक्कादायक घटना इंदूरमध्ये आज, मंगळवारी घडली.…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक

Posted by - June 14, 2024 0
पुणे : केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांची…

अखेर….त्या व्हायरल पत्रावर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

Posted by - May 6, 2022 0
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझे पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *