नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री लढत होण्याची शक्यता?

385 0

आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख अशी लढत होण्याच्या चर्चांना उधान आलं असून यामुळे विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत कोणाची शक्यता आहे.

मतदार संघ पुनर्रचनेमध्ये 2009 मध्ये नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघ अस्तित्वात आला 2009 पासून 2019 पर्यंत सलग तीन वेळा देवेंद्र फडणवीस हे या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेण्यासाठी महाविकास आघाडी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधान असून अनिल देशमुख यांच्या पारंपारिक काटोल विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी दिली जाण्याचे शक्यता व्यक्त केले जात आहे. 2009 पासून देवेंद्र फडणवीस हे या मतदारसंघाचे आमदार असून 2014 च्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचा मताधिक्य 2019 च्या निवडणुकीत घटल्याचं पाहायला मिळालं होतं

2009, 2014 आणि 2019 या तीन निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मताधिक्य कसं होतं?

मतदार संघ पुनर्रचनेमध्ये नव्याने निर्मिती झालेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघाच्या पहिल्याच म्हणजे 2009 च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना 27 हजार 775 इतकं मताधिक्य होतं..

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 58,942 इतका मताधिक्य देवेंद्र फडणवीस यांना मिळालं 

2019 च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 49,344 इतकं मताधिक्य मिळालं होतं म्हणजेच 2014 च्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचा मताधिक्य 9,598 मतांनी घटलं होतं..

देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी मविआ अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असून आता महाविकास आघाडीकडून नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे..

 

Share This News

Related Post

PMPML च्या ई-बस डेपोचं उद्या उद्घाटन ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Posted by - September 1, 2022 0
पुणे : PMPML च्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे उद्या उद्धघाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार…
Ashish Sakharkar

Ashish Sakharkar Passes Away : मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन; त्याची ‘ती’ शेवटची पोस्ट होतेय व्हायरल

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन (Ashish Sakharkar Passes Away) झाले आहे. आशिषने देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत महाराष्ट्राचे…

विधान परिषद निवडणूक: सर्वपक्षीय 246 आमदारांचे मतदान पूर्ण

Posted by - June 20, 2022 0
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. 10 जागांसाठी भाजपाकडून प्रवीण…
Pankaja And Dhananjay Munde

बहिण पंकजांसाठी धनंजय मुंडेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - May 17, 2023 0
बीड : काही दिवसांवर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे मुंडे बहिण-…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *