पुणे जिल्ह्यात वाळू माफियांवर धडक कारवाई, 20 यांत्रिकी बोटी नष्ट तर 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

50 0

पुणे- जिल्ह्यातील दौंडमधल्या भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. या कारवाईत 20 यांत्रिक बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्धवस्त केल्या. तसेच एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा केला जात होता. हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी थेट भीमा नदीच्या पात्रात जाऊन कारवाई केली. तब्बल १० तास ही कारवाई सुरु होती. या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या 20 यांत्रिक बोटी नष्ट केल्या तर एकूण एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्यात फक्त पुण्यातील दौंडमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील वाळू माफियांचा हैदोस आहे. वाळू माफियांवर कारवाई केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याचेही प्रकार राज्यात घडले आहेत. आता या सर्व प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. महसूल विभाग आणि पोलिसांनी वेळोवेळी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यास वाळू माफियांना लगाम बसू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट, म्हणाले …

Posted by - November 10, 2022 0
मुंबई : खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात तीन महिने ते कारागृहात होते. काल…

धक्कादायक ! मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र, तिघांविरोधात गुन्हा

Posted by - May 14, 2022 0
पुणे- मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या मोटारीचा पाठलाग…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली

Posted by - October 10, 2022 0
मुंबई : देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

विष्णु महाराज चक्रांकित यांचे निधन

Posted by - October 30, 2023 0
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अधिकारी श्री विष्णु महाराज चक्रांकित यांचे आळंदी येथे रविवारी वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले .आज(सोमवारी)…

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच सर्वांगीण विकास उपक्रम ; विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रशिक्षण

Posted by - August 13, 2022 0
आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. पुन्हा एकदा शाळांमध्ये विविध उपक्रम पुन्हा रंगू लागले आहेत. काल माध्यमिक विद्यालय, काशिग येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *