मुंबई- ‘बाहुबली’ फेम एसएस राजामौली यांचा आरआरआर चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडीत काढताना दिसत आहे.
साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पीरियड अॅक्शन चित्रपट RRR 25 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हिंदी व्हर्जनने 18 कोटींची कमाई केली आहे.
राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल इतके चांगले रिव्ह्यू मिळत आहेत की, चित्रपट समीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या चित्रपटाने फक्त भारतच नव्हे तर परदेशी प्रेक्षकांनाही रोमांचित केलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडीत काढताना दिसत आहे.