धुलिवंदनानिमित्त मार्केट यार्ड येत्या शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र भाजीपाला आणि पान बाजार या दिवशी सुरू राहील असे पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केले आहे.
येत्या शुक्रवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारातील फुलांचा बाजार, केळी बाजार तसेच मोशी उपबाजार बंद राहणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये.
धुलिवंदन सणाची साप्ताहिक सुट्टी जोडून येत असल्याने शुक्रवारी धुलिवंदनाच्या दिवशी फळे, भाजीपाला बाजार व पान बाजार तसेच येथील उपबाजार नियमितपणे सुरू राहणार आहे. याची नोंद व्यापारी व्यावसायिकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मार्केट यार्ड बंद असले तरी शुक्रवारी भाजीपाला आणि पान बाजार सुरूच राहणार आहे