रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई झपाट्याने वाढत आहे. रशिया, युक्रेनला युरोपचे ‘ब्रेड बास्केट’ म्हटले जाते. जागतिक बाजारपेठेत 29 टक्के गहू आणि 19 टक्के मका यांचा वाटा युक्रेन आणि रशियाचा आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमधून होणाऱ्या गव्हाच्या निर्यातीवरही परिणाम झाल्याने गहू महागला आहे.
त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात पीठ सहा रुपयांनी महागले आहे तर बिस्किटे व इतर उत्पादने महागली आहेत. भारतातून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होत असल्याने स्थानिक बाजारपेठेत गहू आणि पीठ महाग झाले आहे.
गव्हापासून तयार करण्यात येत असलेले पदार्थ महाग झाले आहे.गहू महागल्याने पीठही किलोमागे सहा रुपयांनी महागले आहे. त्याचे दर 30 रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत. इतकेच नाही तर ब्रेड, बिस्किटे, नूडल्स, पिझ्झा आणि रवा याशिवाय गव्हापासून बनवलेल्या इतर वस्तूही महाग होत आहेत. त्यामुळे पुढील वर्षांपर्यंत गव्हाच्या किंमतीत वाढ होईल असे तज्ञांचे मत आहे.