मुळा खा आणि आजारांना दूर ठेवा

59 0

बहुगुणी असूनही मुळा हे एक दुर्लक्षित कंदमूळ आहे. मुळा चवीला तिखट असल्याने अनेक जण मुळ्याचा आहारात समावेश करणं टाळतात. मात्र मुळा खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. मात्र त्याचे सेवन नियमित आणि योग्य प्रमाणात करावे.

जाणून घ्या मुळ्याचे शरीरासाठी होणारे फायदे

कावीळ आजारावर गुणकारी
कावीळ झाल्यास आहारात मुळ्याचा अवश्य समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो.

डायबेटिज रुग्णांसाठी लाभदायक
मुळा खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मुळ्याचे सेवन करणे डायबेटिज रुग्णांसाठी लाभदायक आहे.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
मुळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच आहारात मुळ्याचा समावेश केला कॅलरी कमी होण्यासही मदत मिळते. परिणामी वजन कमी होण्यासही मदत होते.

बद्धकोष्ठता आजारावर गुणकारी
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी रोज थोडा मुळा अवश्य खावा. मुळ्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

किडनीस्टोन आजारावर गुणकारी
मुळ्यातील कॅल्शियम ऑक्सालेट हे किडनीस्टोन शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करते.

ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखतो
मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मुळा उपयोगी आहे.

अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयोगी
अशक्तपणा जाणवत असेल तर मुळ्याचे सेवन करावे. मुळ्यामध्ये फॉस्फरस आणि आर्यन असतात. यांमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

भूक वाढण्यास मदत होते
मुळ्याच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळून पिल्यास भूक वाढण्यास मदत.

Share This News

Related Post

Soaked Dry Fruits Benefits

Soaked Dry Fruits Benefits : ‘हे’ 5 ड्रायफ्रुट्स नियमीत भिजवून खा; शरीराला मिळतील दुप्पट फायदे

Posted by - September 15, 2023 0
बदलत्या जीवनशैलीचा विचार करता आपल्या शरीराकरता ड्रायफ्रुट्स (Soaked Dry Fruits Benefits) खाणे अत्यंत गरजेचे आहे. ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक…

इंटरनेटशिवायही जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यावरील शिल्लक

Posted by - April 14, 2022 0
नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1% व्याज दर निश्चित केला आहे. पीएफचे व्याज लवकरच…

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड; वयाच्या 88 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - March 18, 2023 0
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील…

पुनश्च हरिओम..! आजपासून राज्यात दहावीची ऑफलाइन परीक्षा सुरू

Posted by - March 15, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहेकोरोनामुळे दोन वर्षांनंतर…

तुमच्या आरोग्यासाठी सुक्या खोबऱ्याचे फायदे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Posted by - May 17, 2022 0
तुमच्या घरात नेहमी सुके खोबरे असते. मात्र, तुम्हाला या सुक्या खोबऱ्याचे फायदे किती आहेत, हे बऱ्यादा माहीत नसते. सुके खोबरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *