नवाब मलिक आणखी दोन आठवडे तुरुंगातच!

365 0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी दोन आठवडयांनी वाढला आहे.

नवाब मलिक यांना ‘टेरर फंडिंग`च्या आरोपावरून ईडीने अटक केली आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.आज त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार होती. मात्र न्यायालयाने आणखी दोन आठवड्यासाठी न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवली आहे.

गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले या आरोपावरून मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती.

मागील सुनावणीवेळी न्यायालयाने मलिक यांच्या तीन मागण्या मान्य केल्या होत्या. न्यायालयीन कोठडीत बेड, गादी आणि खुर्ची देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यापूर्वीही मलिक यांनी ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या केल्या होत्या. या तीनही मागण्या न्यायालययाने मान्य केल्या होत्या.

Share This News

Related Post

स्वारगेट-महाबळेश्वर एसटी बसमध्ये बंदुकीची गोळी सापडल्याने खळबळ

Posted by - May 26, 2022 0
पाचगणी – स्वारगेट- महाबळेश्वर एसटी बस पाचगणीमध्ये आल्यानंतर आज, गुरुवारी सकाळी एसटीमध्ये चक्क बंदुकीची गोळी आढळून आली. पोलिसांनी ही गोळी…

“मुक्ताताई टिळक म्हणजे आदर्श कार्यकर्त्याचा वस्तूपाठ; पुण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान…!” – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

Posted by - December 22, 2022 0
पुणे : कसबा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात शोकसंवेदना…

धक्कादायक ! आई वडिलांनी पोटच्या मुलाला डांबून ठेवले, ते सुद्धा २२ कुत्र्यांच्या सोबत

Posted by - May 11, 2022 0
पुणे- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईवडिलांना आपले मूल म्हणजे जीव की प्राण असते. पण या जगात असेही…

कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ ?

Posted by - August 15, 2022 0
भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचं…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, हार्दिक पटेलचा राजीनामा

Posted by - May 18, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *