नवी मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेविकेची शिवसेना विभाग प्रमुखाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

596 0

नवी मुंबई – शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या बेलापूर येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली. या प्रकरणी प्रकाश आमटे यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मारहाण कशासाठी ?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष नवी मुंबई महापालिकेवर आहे. अलीकडेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी समर्थकांसह उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी भारती कोळी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता. भरती कोळी या भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे शिवसेना विभागप्रमुख प्रकाश आमटे यांनी या प्रकाराचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवला होता. भारती कोळी भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ वरिष्ठांना पाठवले होते. याचा राग अनावर झाल्याने भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली.

Share This News

Related Post

Gautami Patil

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

Posted by - May 15, 2023 0
सोलापूर : आपल्या नृत्याच्या जोरावर सगळ्यांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात (Barshi Police Station)…
Theft Video

Theft Video : सर्वांच्या डोळ्यादेखत चोरट्याने लंपास केला iPhone; चोरीची पद्धत पाहून व्हाल थक्क

Posted by - June 20, 2023 0
नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत चोरीची (Theft Video) अनेक प्रकरणे पाहिली असतील. कुणी रात्रीच्या वेळी गुपचूप लपून चोरी करताना, कुणी…

नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजाराकडून मोबाईल आणि सीमकार्ड जप्त; नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले…

Posted by - March 24, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देणारा आरोपी जयेश पुजारी याच्याकडून धमकी देण्यात आलेला मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात…

मोदी सरकार अहंकारी ! २०२४ मध्ये देशात मोदी सरकार येणार नाही, केजरीवाल यांचे भाकीत

Posted by - May 24, 2023 0
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर…

आताची महत्वाची बातमी ! विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी

Posted by - June 27, 2022 0
नवी दिल्ली- शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळं महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *