नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो. त्याला अलीकडेच पत्नी आयशापासून घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला. धवनचा मुलगा जोरावरचा मंगळवारी (26 डिसेंबर) वाढदिवस झाला. मात्र, मुलांचा ताबा पत्नीकडे असल्याने धवन आपल्या मुलाला भेटू शकला नाही. मात्र त्याने आपल्या मुलासाठी एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय लिहिले आहे पोस्टमध्ये?
माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जरी मी थेट कनेक्ट होऊ शकत नसलो तरी, मी नेहमीच तुमच्याशी टेलिपॅथीद्वारे (मनातून संवाद) जोडलेला असतो. मला तुझा खूप अभिमान आहे, आणि मला माहित आहे की तुझं खूप चांगलं चाललं आहे, मोठा होत आहेस. तुझे बाबा तुझी नेहमीच आठवण ठेवतात आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो नेहमी सकारात्मक राहतो आणि देवाच्या कृपेनं भेटीच्या दिवसाची वाट पाहतो. खोडकर हो, परंतु विचलित होऊ नकोस. इतरांना मदत कर, नम्र हो, दयाळू हो, धीर धरायला शिक आणि मजबूत रहा. तुला भेटण्यास सक्षम नसतानाही, मी जवळजवळ दररोज तुला मेसेज पाठवतो. मला तुझ्या चांगलं असण्याबद्दल आणि दैनंदिन जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा काय घडत आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. तुम्हाला खूप खूप प्रेम.
शिखर धवनची काळीज चिरणारी पोस्ट पाहून त्याचे चाहतेदेखील भावुक झाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, या ओळी वाचून माझे हृदय तुटले आहे. दुसर्याने लिहिलं की, आणि इथं सर्व पुरुष रडले. एकाने लिहिलं, कोण म्हणतं पुरुष रडत नाहीत? त्याला इथं आणा. अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन
Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव
Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात
Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी
ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा