आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना चेन्नईच्या गोटातून मोठी बातमी आली आहे.
एम. एस. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. विस्फोटक अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची घोषणा करण्यात आली आहे.
महेंद्रसिंह धोनीनं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत होता. याच दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोडल्याची माहिती समोर आलीय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे.