मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रश्मी शुक्लांसह डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे सांगितलं आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी न्यायालयापुढे हा दावा सादर करण्यात आला आहे.
नाना पटोले म्हणाले की, कथित फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत मी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी सरकारनं आश्वासन दिलं की, आम्ही चौकशी करतो. चौकशीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे कारवाई करतो. सरकारकडून संपूर्ण चौकशी करण्यात आली. त्यावेळच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ह्या त्याठिकाणी दोषी आढळल्या.
माझे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांविरोधात ५०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. या कटामागील सूत्रधार कोण हेही पुढे येणे आवश्यक आहे. pic.twitter.com/EVvgnzozCk
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 24, 2022
त्यामुळं रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आम्ही मानहानीचा दावा ठोकला आहे. या पद्धतीनं कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन त्याला त्रास देणं. त्याला ब्लाकमेल करणं. ही पद्धत बंद व्हावी, या यामागचा उद्देश आहे. या सगळ्या षडयंत्राच्या मागे आणखी कोण-कोण आहे, ही स्पष्टता पुढं यावी असे नाना पटोले यांनी सांगितले. नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न उघड केल्याशिवाय राहणार नाही, असं पटोले म्हणाले.
अमजद खान या नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता.