भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात (IND VS SA ODI Series) आजपासून वनडे क्रिकेट सिरीजला सुरुवात झाली. या सामन्यात टीम इंडियाने द. आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह पहिला सामना जिंकून टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना न्यू वंडरर्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला द. आफ्रिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा निर्णय चांगलाच अंगलट आला. द. आफ्रिकेच्या फलंदाजांपैकी टोनी डी झॉर्झीने 28, एडन मार्करामने 12 आणि फेहलुकवायोने 33 धावा केल्या तर बाकी फलंदाजांनी निराशा केली. टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर द आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. टीम इंडियाने 28 ओव्हरमध्ये 116 धावांवर द आफ्रिकेला ऑल आउट केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी अर्शदीप सिंहने 5, आवेश खानने 4 विकेट्स आणि कुलदीप सिंहने 1 विकेट्स घेतल्या.
यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन हे दोघे मैदानात आले. परंतु ऋतुराज गायकवाड 5 धावा करून बाद झाला परंतु पदार्पणाचा सामना खेळत असलेला साई सुदर्शन मैदानावर टिकून राहिला. साईला श्रेयस अय्यरची देखील मजबूत साथ मिळाली. श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शनने अर्शशतक झळकावत टीम इंडियाला विजयाच्या उंबरटयावर नेले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश
Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी केल्या ‘या’ 10 प्रमुख मागण्या
Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार