Sajjan Jindal

Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप

856 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JSW समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी एका अभिनेत्रीने 13 डिसेंबर रोजी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना जानेवारी 2022 मध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये घडली आहे. तिच्या तक्रारीकडे लक्ष न दिल्याने तिला कोर्टामध्ये धाव घ्यावी लागली असे पीडितेने म्हंटले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
पीडित अभिनेत्री आणि सज्जन जिंदाल यांची 2021 मध्ये दुबईमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती, जिथे दोघेही आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गेले होते. यानंतर दोघांनीही मुंबईत एकमेकांची भेट घेतली. मालमत्ता खरेदी करण्यासंदर्भात एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. काही दिवसानंतर सज्जन जिंदाल अभिनेत्रीला बेब अशी हाक मारू लागले. तसेच आपल्या लग्नासंबंधित वैयक्तिक गोष्टी सांगितल्या, जे ऐकून अभिनेत्रीला अस्वस्थ वाटू लागले. या घटनेनंतर एमडीने अभिनेत्रीचा नंबर ब्लॉक केला आणि अभिनेत्री तक्रार दाखल करणार असल्याचे दिग्दर्शकाला कळताच त्याने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने फेब्रुवारी 2023 मध्ये एमडी विरुद्ध कलम 376 आणि 354 अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली.

तसेच पीडित महिला पुढे म्हणाली, “सज्जन जिंदालचे पत्नीशी चांगले संबंध नव्हते. परंतु, समाज आणि मुलांकडे बघून ते पती-पत्नीचे नाते पुढे नेत असल्याचे त्यांनी पीडिताला सांगितले. यानंतर जिंदाल यांनी पीडिताला तिच्यामध्ये खूप रस असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आणि किस इमोजी पाठवण्यास सुरुवात केली. हळुहळू जिंदालने लग्नाच्या बहाण्याने पीडितेशी जवळीक साधली. यानंतर पीडिताला बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला”, असा आरोप करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू

Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!