बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना यांचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला करत 16 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चित्रपटानं 800 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाची एकीकडे सगळ्यांना भुरळ पडली असताना आता त्याच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसणार याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री मालविका मोहनन दिसणार आहे. तर तृप्ती डिमरीप्रमाणे ती रणबीरच्या विरोधात असणाऱ्या टीममध्ये असेल. दरम्यान, यावर अजून काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याविषयी चित्रपट समिक्षक रमेश बाला यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितलं की मालविका आणि रणबीर एकत्र दिसण्याची शक्यता आहे. त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.
‘ॲनिमल’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, प्रेम चोप्रा, रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात बॉबी देओलच्या कामाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी केल्या ‘या’ 10 प्रमुख मागण्या
Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार