Team India

IND Vs IRE : आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूकडे देण्यात आली कर्णधारपदाची जबाबदारी

460 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर (IND Vs IRE) जाणार आहे. या दौऱ्यासाठी BCCI ने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात (IND Vs IRE) भारताला 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात हार्दिक पांड्यासह सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहला टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर ऋतुराज गायकवाडला आयर्लंड दौऱ्यासाठी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया-
जसप्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीप), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार, आवेश खान.

‘या’ खेळाडूंना विश्रांती
रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज यांना या सिरीजमधून विश्रांती देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!